TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

सिंहगडरोड येथे मोफत सॅनिटरी पॅड वाटप उपक्रमाचे आयोजन

पुणे | जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘निर्मार्जनम मोहिमेअंतर्गत’ वस्ती भागातील महिलांना सॅनिटरी पॅड बाबत जनजागृती व मोफत वाटप उपक्रमाचे मातृभूमी सेवा संस्था व अॅड.देविका कुलकर्णी बाम यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमात सिंहगड रोडवरील साई नगर, हिंगणे खुर्द, राम नगर, माणिकबाग येथील सुमारे २०० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. अॅड.देविका कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या ३ वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मातृभूमीचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम बहिरट, बिल्वा जोग, भाग्यश्री जगताप, नम्रता बहिरट, शैला शिळीमकर यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका साकारली. महिलांची मासिक पाळीतील स्वच्छता अशा नाजूक आणि मोकळेपणाने व उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबाबत जनजागृती करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, असे देविका कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button