पुण्यात झिका व्हायरस रुग्णांची संख्या सात वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-57-1-780x470.jpg)
पुणे : शहरात झिका व्हायरसचा सातवा रुग्ण आढळला असून आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यापैकी कोणालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
डहाणूकर कॉलनी येथील 45 वर्षीय महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. या रुग्णाला झिकाची सौम्य लक्षणे आहेत. यापूर्वी एरंडवणे भागातील चार आणि मुंढवा परिसरातील दोन रुग्णांना झिकाचे निदान झाले आहेत. त्यानंतर आता शहराच्या डहाणूकर कॉलनी मध्ये सातवा रुग्ण आढळला. यात सात रुग्णांमध्ये पाच महिला असून दोन पुरुष आहेत.
हेही वाचा – ‘पाण्याची गळती रोखून पुणे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणार‘; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाच महिलांमध्ये दोन गर्भवती असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेकडून रुग्ण आढळलेल्या घरांमध्ये आणि भोवतालच्या एक किलोमीटर भागात फवारणी करण्यात येत असल्याची विभागातर्फे सांगण्यात आले.