२८ मार्चपासून पुण्याहून पाच शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा
पुणे – खासगी विमान कंपनी स्पाइसजेटने २८ मार्चपासून पुण्याहून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी कंपनी किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरू करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गांसाठी अधिकच्या फ्लाईट सुरू करण्यात येतील.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,70,507 वर
पुण्याला विमानाद्वारे दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या शहरांशी जोडणारी स्पाइसजेट ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच छोट्या शहरांतून विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे UDAN योजनेअंतर्गत स्पाइसजेट या पाच मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरू करणार, असेही कंपनीने म्हटले आहे.