breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,70,507 वर

  • मुंबईत 2,377, पुण्यात 4,745 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होतेय. राज्यात बुधवारी दिवसभरात 23,179 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 9,138 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तसेच 84 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 23,70,507 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 53,080 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 21,63,391 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1,52,760 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 2,377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 876 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,49,958 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,547 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,20,754 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी 4,745 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,48,567 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 9,455 इतका झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button