भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पुण्याच्या लोणीकंद परिसरातील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crime-3-1.jpg)
पुणे | पत्नीचे स्वतःच्या भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशय आतून पतीने पोटात चाकू खुपसून पत्नीचा खून केला. सोमवारी पहाटे पुण्याच्या लोणीकंद परिसरातील लेबर कॅम्पमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.अनु राजू मिर्झा (वय २८) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजू पुनाराम मिर्झा (वय ३०) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मूळचे छत्तीसगड येथील असलेले मिर्झा कुटुंबीय पुण्यातील लोणीकंद परिसरातील बांधकाम इमारतीवर लेबरचे काम करतात. त्याठिकाणी असलेल्या लेबर कँम्पवर ते राहत होते. त्याचठिकाणी काम व तेथेच राहत असत. त्याचठिकाणी आरोपी राजू याचा भाऊ व अनु यांचा दिर याच्या कुटूंबासोबत राहत होती. तर, त्याच्याशी बोलत असे. त्यामुळे त्याला संशय येत होता.
दरम्यान आज पहाटेच्या सुमारास राजू मिर्झा पत्नी झोपलेल्या खोलीजवळ आला आणि त्याने पत्नी अनुला खोलीबाहेर बोलावले. त्याने पत्नीसोबत बोलत असताना वाद घातला आणि तू माझ्या भावासोबत बोलतेस तसेच, त्यांच्या कुटूंबासोबत राहतेस, असे म्हणत प्लास्टिकच्या पिशवीत आणलेला चाकूने पोटावर सपासप वारकरून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले.