महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव दराने महागाई भत्ता
पुणे | महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाप्रमाणे ३ टक्के वाढीव सुधारित दराने महागाई भत्ता मिळणार आहे़.यानुसार महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा २८ टक्क्यांवरून ३१ टक्के सुधारित दराने अदा होणार आहे़.महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या दराने महागाई भत्ता देण्यात येत आहे़. त्यानुसार सद्यस्थितीला १ जुलै, २०२१ पासून महागाई भत्ता सुधारित दर २५ टक्के वाढून तो १६४ वरून १८९ या दराने सप्टेंबर, २०२१ च्या बिलातून फरकासह अदा करण्यात आला होता़.
आता ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर ३ टक्क्यांनी वाढवून तो २८ टक्क्यांवरून ३१ टक्के इतका करण्यात आला आहे़. त्यामुळे जुलै २०२१ ते आॅक्टोबर २०२१ या चार महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी रक्कम ही ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे फरक अदा करताना देण्यात येणार आहे़. पण नोव्हेंबर व डिसेंबर, २०२१ या दोन महिन्याचा महागाई भत्ता सुधारित दरानुसार म्हणजेच ३१ टक्क्यांनी वाढवून तो जानेवारी, २०२२ च्या पगाराबरोबर फे ब्रुवारी, २०२२ मध्ये अदा करण्यात येणार आहे़.