Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मतदानाच्या दिवशी महापालिकेला सुट्टी

पुणे : विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी ( दि.२० नोव्हेंबर) रोजी महापालिकेच्या अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांंना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस दिले होते.
हेही वाचा – महिला पत्रकाराला उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी
त्यानुसार, महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवांमधील कामगारांना मतदानाच्या दिवशी दोन तास सवलत देण्यात येणार आहे.तर या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याचा अहवाल सर्व विभाग प्रमुखांना खातरजमा करून महापालिकेच्या कामगार कल्याण विभागास सादर करावा लागणार आहे.





