Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये’ समावेश

 

मावळ – कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोना बाधितांसाठी झोकून देऊन काम केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या लंडनधील संस्थेच्या मानाच्या यादीत समावेश झाला आहे. संस्थेचे सचिव डॉ. दीपक हरके, महाराष्ट्र उपाध्यक्ष महबूब सय्यद यांच्या हस्ते खासदार बारणे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळात कोरोना बाधित रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार व्हावेत यासाठी मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेऊन मदत केली. कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेतला. अन्न धान्य वाटप कोरोना हॅास्पिलसाठी साहित्याची मदत, कोरोना रूग्णांचे बील कमी करण्यासाठी प्रयत्न केले. बिलांची रक्कम कमी करून दिली. या सर्व कार्यांची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन मध्ये खासदार बारणे यांचा समावेश झाला. त्यांना प्रमाणपत्र देत केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button