Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आमदार शरद सोनवणेंची ‘घरवापसी’; सभा घेत केला शिदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

पुणे :  विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे पक्षात इन्कमिंग वाढताना दिसत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून, ठाकरे गटातील आणि इतर नेते पक्षात दाखल होते आहेत. आता जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंची शिवसेना शिंदे पक्षात घरवापसी झाली आहे. जुन्नरमध्ये जाहीर सभा घेत सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

सोनवणे यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेंना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बळ वाढले आहे. या पक्ष प्रवेशासाठी जुन्नरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शरद सोनवणे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

 हेही वाचा –  प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया; उपमुख्यमंत्री अजित पवार

शरद सोनवणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले, पण त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यानंतर नाराज झालेल्या आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत लोकसभा लढवली. पण ते पराभूत झाले. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यामुळे ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी शरद सोनवणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

जुन्नर विधानसभा क्षेत्रातून शरद सोनवणे हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मूळात सोनवणे हे पूर्चीचे शिवसैनिकच आहेत. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश न मानता या मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आमदार शरद सोनवणे यांची पुन्हा एकदा घरवापसी झाली असून ते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पोकळी भरून काढणार का हे आगामी काळात पाहावे लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button