Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोळु येथे एमआयटी महाविद्यालयाचा डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम उत्साहात

उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक, मोबाईल व इंटरनेट सुरक्षिततेचे मार्गदर्शन

पुणे : आळंदी येथील एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजतर्फे उन्नत भारत अभियान (UBA) अंतर्गत खेड तालुक्यातील सोळु येथे डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोळु येथे आयोजित या उपक्रमात ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना संगणक व मोबाईलचा मूलभूत वापर, इंटरनेट सुरक्षितता तसेच शैक्षणिक उपयोगासाठी विविध डिजिटल साधनांचा कसा उपयोग करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि संगणक वापराची माहिती दिली.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.

हेही वाचा –  अशोक खरात प्रकरणावर मंत्री अदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका; राजकीय नेत्यांच्या फोटोंबाबतही केलं भाष्य

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दिनकर राठोड व प्रा. ओंकार डेंगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. श्रीराम कारगांवकर आणि संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली विलास पालांडे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव माने, अपूर्वा पाटील, संकल्प भिसे, मेघाली मोटारे, वेदांत म्हस्के, सार्थक दराडे, श्रेयश नाझीरकर आणि शांतनू टोपे या विद्यार्थी स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव…

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव ही आजही मोठी दरी असून, अशा जनजागृती उपक्रमांमुळे ही दरी कमी करण्यास हातभार लागतो. एमआयटी महाविद्यालयाच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच मिळत नाही, तर सुरक्षित इंटरनेट वापर आणि शैक्षणिक प्रगतीसाठी डिजिटल साधनांचा प्रभावी उपयोग करण्याची क्षमता विकसित होते. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगात सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button