म्हाडाच्या पुणे मंडळाची ‘लॉटरी’ लांबणीवर, नवी तारीख झाली जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Amit-Satam-7-780x470.jpg)
पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीची तारीख बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ६,२९४ घरांची सोडत २८ जानेवारीला निघणार होती. मात्र ऐनवेळी ही तारीख बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६,२९४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस मागील वर्षी ९ ऑक्टोबरला सुरुवात झाली होती. पुणे, पिंपरी – चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे. पुण्यात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
हेही वाचा – सावधान! पुण्यात जीबीएस रुग्णसंख्येने गाठला शंभरचा आकडा
दरम्यान, घरासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर २८ जानेवारीला सोडत जाहीर होणार होती. मात्र आता ही तारीख बदलण्यात आली आहे. २८ जानेवारी ऐवजी म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीची तारीख २९ जानेवारी करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांना एक दिवस अजून वाट बघावी लागणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा