TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

टू व्हीलर रॅपिडो ओला उबर, रिक्षा चालकांच्या आंदोलन संदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट

बेकायदेशीर टू व्हीलर टॅक्सी विरोधात १९ डिसेंबर रोजी देशभर आंदोलन : बाबा कांबळे

कल्याणकारी मंडळासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालक आंदोलन करणार  : बाबा कांबळे 

१९ डिसेंबर पुणे विधान भवन येथे पुणे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे प्रतिनिधी

बेकायदेशीर टू व्हीलर टॅक्सी परवानगी नसताना महाराष्ट्र सह देशभरामध्ये बिंदासपणे सुरू आहे यामध्ये या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने हे बेकायदेशीर सेवा दिली जात आहे, यामुळे रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट सेवा देणाऱ्या व्यवसायावरती मोठा परिणाम झाला आहे, रिक्षावर टॅक्सी चालकांचे तर जगणं मुश्किल झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, या प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पुणे येथे 28 नोव्हेंबर रोजी बंद पुकारला, परंतु काही बोगस संघटनाने या बंदला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आंदोलन फसले, आता या बोगस संघटना 12 तारखेला आंदोलन करण्याचं बोलत आहेत परंतु रिक्षा चालकांचा त्यांनी विश्वास गमावला असल्यामुळे प्रमाणिकपणे आणि सचोटीने व्यवसाय करणारे रिक्षा चालक यांना प्रतिसाद देणार नाही, जन्मदिवसाच्या त्यांना मोबाईल असावी व टू व्हीलर रॅपिडो ओला उबर वरती कारवाई करण्यात यावी यासाठी आज, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती सलग्न रिक्षा संघटना आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांची भेट घेऊन चर्चा केली,

शिष्टमंडळात, महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंत तांबे, भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव, छावा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पिंटू पांचाळ, वाहन चालक मालक सामाजिक संघ अध्यक्ष अफजल पठाण, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे रुपेश भोसले, महाराष्ट्र वाहतूक पंचायत चे प्रकाश यशवंते, कृती समिती पुणे जिल्हा समन्वयक आप्पा हिरेमठ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर नेते, विलास केमसे पाटील, मोहम्मद शेख, मुराद, काजी, सह एकूण 17 संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते,

बोगस रिक्षा संघटना आणि बोगस रिक्षाचालक गुंडगिरी करून रिक्षाचालकांची प्रतिमा खराब करत आहे यावर पोलिसांनी कारवाई करावी

काही बोगस रिक्षा संघटनांनी व त्यांच्या बोगस रिक्षा चालकांनी, प्रवाशांना लुटने, भाडे नाकारणारे, लायसन्स बॅच नासताना बेकायदेशीरपणे रिक्षा व्यवसाय करने, प्रायव्हेट रिक्षा मधून व्यवसाय करणे, अशा बोगस रिक्षा चालकांची गुंडांची फौज तयार करून, समाजामध्ये अशांतता पसरण्याचा प्रयत्न करत आहेत अशा बोगस व्यक्तींच्या विरोधात विरोधात आवाज उठवल्यामुळे बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना देखील हे बदनाम करत आहेत, असे जे बोगस संघटना व बोगस रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, पोलीस प्रशासनाने अशा संघटना व बोगसिक रिक्षा चालकांवर कारवाई करून खऱ्या व प्रमाण दिवसालाकांना न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे, अशी माहिती देखील बाबा कांबळे यांनी दिली आहे,

वीस वर्षापासून कल्याणकारी मंडळाचे प्रश्न प्रलंबित

रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ होणे गरजेचे आहे. त्याबाबत देशात, महाराष्ट्रात वारंवार आंदोलन करून मागणी लावून धरली आहे. मात्र केंद्रात व राज्यात असणाऱ्या कोणत्याही सरकारला रिक्षा चालक-मालकांचे देणे घेणे नाही. त्यामुळे अद्याप रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात आलेले नाही. हे महामंडळ अस्तित्वात यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागणीसाठी पुणे विभागीय कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या वेळी महाराष्ट्रसह देशभर एकाच वेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ,आंदोलन होतील, असेही बाबा कांबळे म्हणाले.    

बाबा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हणाले की, १९ तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. केंद्र सरकारचे संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान पुणे विभागीय आयुक्त कार्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच देशभरामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, या ठिकाणी एकाच वेळी आंदोलन होणार आहे. या आंदोलनातून केंद्र सरकारचे प्रश्नांकडे लक्ष जाईल असा हेतू आहे.  या आंदोलनाच्या लढ्याला आता देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.  काही बोगस रिक्षा संघटना १२ डिसेंबर रोजी बंद पुकारणार आहेत. या बंद मध्ये आमच्या संयुक्त कृती समितीचा, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा सहभाग नसणार आहे. ज्या संघटनांचे कायदेशीर  रजिस्ट्रेशन झाले नाही, त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावे. रिक्षा चालकांची फसवणूक करू नये, अशी टीका बाबा कांबळे यांनी केली. स्वतःच्या चुका झाकण्याचे प्रयत्न बोगस रिक्षा संघटना सातत्याने करत आहेत. त्यांच्या फसव्या नेतृत्वाला रिक्षा चालकांनी बळी पडू नये, असेही आवाहन बाबा कांबळे यांनी या मार्फत केले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button