ताज्या घडामोडीपुणे

मावळातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज!

मावळातील १०३ ग्रामपंचायतींचे सरपंच पदांसाठी आरक्षण जाहीर

लोणावळा : आगामी पाच वर्षांसाठी मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बुधवारी वडगाव मावळ येथे काढण्यात आली. यामध्ये मावळातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार आहे.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या पुरुष व महिला प्रवर्गासह नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि पुरुष सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणच्या इच्छुकांचा आनंद द्विगुणित झाला असून, ज्या ग्रामपंचायतीचे आरक्षण इतर वर्गांसाठी राखीव झाले आहेत. त्या ठिकाणच्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले असून, त्यांच्या इच्छा आकांक्षावर पाणी पडले आहे. तर आरक्षण जाहीर झाल्याने आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ संपणार असल्याने सदर ग्रामपंचायती व ग्रुप ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत बुधवारी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंचासह मोठ्या संख्येने आगामी इच्छुकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा  :  पिंपरी-चिंचवडमधील दुषित पाणी पुरवठ्यावरुन प्रशासनाची ‘धुलाई’ 

जाहीर झालेले आरक्षण :

सर्वसाधारण :- अजिवली, ठाकूरसाई, कडधे,
कान्हे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, आढे, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, उकसान, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहळ, कोंडीवडे (आं. मा), माळवाडी, वाकसई, मुंढावरे व आंबेगाव

सर्वसाधारण महिला:- केवरे, काले, शिवली, कोथुर्णे, महागाव, थुगाव, ओझर्डे, डोणे, सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, टाकवे खुर्द, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी, निगडे, टाकवे बुद्रुक, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, घोणशेत,

नागरिकांचा मागास प्रवर्ग :- मळवली, कांब्रे, शिलाटणे, करंजगाव, येलघोल, सांगिसे, वराळे, दारुंब्रे, पाचाणे, भाजे, धामणे, मळवंडी ढोरे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला:- सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा (कामशेत), मोरवे, शिरगाव, वारु, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बौर, खांडशी, पाटण

अनुसूचित जमाती महिला:- जांबवडे, जांभूळ, करुंज

अनुसूचित जमाती :- देवले, मळवंडी ठुले, डोंगरगाव

अनुसूचित जाती महिला :- कान्हे, शिवणे, ओवळे, शिळींब, तुंग

अनुसूचित जाती :- आंबी, कुसगाव प.मा., आढले बुद्रुक, नाणे

अनुसूचित जमाती महिला :– कुसवली, उदेवाडी, खांड, कशाळ, इंगळूण

अनुसूचित जमाती :- शिरदे, कुणेनामा, सावळा, वडेश्वर, माळेगाव बुद्रुक

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button