मुळशीत प्राज कंपनीला भीषण आग: केमिकलमुळे आगीची शक्यता, अग्निशामक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

पुणे : मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा परिसरात असलेल्या नामांकित प्राज कंपनीला आज (28 मार्च 2025) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत असलेल्या केमिकलमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक वाहने आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आग लागल्याची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण केमिकलमुळे आग भडकल्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली असून, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा – पिंपरीत ३० टक्के नालेसफाई, कामाला गती देण्याचा आयुक्तांचा आदेश
प्राज कंपनी ही बायो-इंधन आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात नावाजलेली कंपनी आहे. या घटनेमुळे कंपनीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण आणि नुकसानीचा अंदाज लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.