Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामती बाजार समितीतून लंडनला आंबा रवाना

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधा केंद्रावरून चालू हंगामातील आंब्याचा पहिला कंटेनर लंडनला रवाना झाला. सभापती विश्वासराव आटोळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून हा कंटेनर रवाना करण्यात आला. पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 2014 पासून चालविले जात आहे.

रेन्बो इंटरनॅशनल प्रा. लि. पुणे यांच्यामार्फत दरवर्षी आंबा निर्यात केला जातो. निर्यातदारांमुळे आंबा उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने 2007 मध्ये जळोची येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता जळोची येथे आणखी एक मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्र उभारण्यात आले असून, तो प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. नवीन निर्यातदार येणार असल्याने त्याचा उपयोग परिसरातील शेतकर्‍यांना होणार असल्याचे मत सभापती आटोळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा –  10 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट समोर, RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली महत्वाची माहिती

गतवर्षी याच सुविधा केंद्रावरून 485 टन आंबा ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका व चीन या देशात निर्यात झाला. सुविधा केंद्रातून यंदा सुरुवातीला पहिल्या कंटेनरमध्ये 10 टन आंबा लंडनकडे रवाना झाला. आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी सेंद्रीय खताचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे व रेसेड्यू फ्री उत्पादन करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी या वेळी केले.

आंब्याची निर्यात बारामतीतून गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. आत्तापर्यंत रेन्बो इंटरनॅशनलचे या कंपनीने लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन या देशात देवगड हापूस, केशर आंबा निर्यात केला आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यांतील शेतकर्‍यांचा निर्यातक्षम आंबा खरेदी करून आकर्षक पॅकिंग करून त्याची परदेशी बाजारपेठेत निर्यात केली जाते. यासाठी कृषी विभागाचेही सहकार्य घेतले जाते. सध्या निर्यात सुरू झाली असल्याने लंडन येथे पहिला कंटेनर पाठवीत असून, पुढे ऑर्डरप्रमाणे इतर देशांतही निर्यात करण्याचा मानस असल्याची माहिती रेन्बो इंटरनॅशनलचे मालक अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button