Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

बंदी उठवल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत: “लांडेवाडीत रेकॉर्डब्रेक गर्दी अनं बैलगाडा शर्यतीचा थरार!”

पुणे । प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी गावात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयातून बंदी उठवल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतींना मा.सर्वोच्च न्यायालयात परवानगी मिळाल्यानंतर माझ्या लांडेवाडी गावात शितलादेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतींना रेकॉर्डब्रेक गर्दी करत मोठ्या संख्येने बैलगाडा मालक, शेतकरी, बैलगाडा शौकीन, गाडा अनाउंसर, वाजंत्रीवाले, छोटे मोठे व्यावसायिक सहभागी झाले. महाराष्ट्राची अस्मिता व पारंपारिक वारसा असलेली बैलगाडा शर्यत सुरू होऊन शर्यतीस दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मला अतिशय आनंद होत असून आपल्या सर्वांचे मी मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो.

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button