गोवंश हत्या तस्करांवर कायदेशीर कारवाई व्हावी
![Legal action should be taken against cattle slaughtering traffickers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/26_03_2019-25chd26-c-2_19073621_0183.jpg)
जिल्हाधिकार्यांना निवेदन ः अखिल भारतीय गो-रक्षा समितीचा आंदोलनाचा इशारा
पुणे । महाईन्यूज । पुणे ग्रामीण क्षेत्रातील विशेषतः मावळ तालुक्यातील मोकाट जनावरे – गाई-बैल, वासरे व गोठ्यांमधील मालकी हक्काची पाळीव जनावरांची मोठ्या प्रमाणात रातोरात तस्करी केली जात आहे. शहराबाहेर नेऊन या जनावरांना कापून मांस शहरात विक्रीसाठी पाठविले जात आहे. अशा प्रकारचे घृष्णास्पद काम काही समाजकंटकांद्वारे सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड व लगतच्या भागात मोठया प्रमाणत सूरू आहे. यावर ताबडतोब प्रतिबंध घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय गो-रक्षा समितीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गाय ही आमच्या हिंदू संस्कृतीची गोमाता असून, हिंदू अस्मितेचे प्रतिक आहे, असे असताना बेकायदेशीरपणे गोमातेची तस्करी करून हत्या केली जात आहे. हा प्रकात अत्यंत घृष्णास्पद असून, हिंदू धर्मियांसाठी लांधनास्पद आहे. सदर प्रकरणामध्ये पैशाची मोठी उलाढाल होत असल्याने कित्येक व्यापारीही नफ्याकरिता या व्यवसायामध्ये सक्रियपणे सहभागी होतात.
पुणे जिल्ह्यात सामाजिक व धार्मिक सलोखा, शांतता न बिघडता पूर्ववत राहण्याकरीता आपण जातीने लक्ष घालून संबंधित चोरट्यांवर, व्यापारी, दलाल, तसेच शहरी व ग्रामीण भागातील गोमांस विक्रेत्यांची व सदर व्यवसायास प्रोत्साहन देणारे धर्ममार्तंड, समाजकंटक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. या संबंधित वडगाव मावळ, चाकण, पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
अशा दुष्ट प्रवृत्ती, समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय गोर-क्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश ब्रह्मा, राष्ट्रीय अध्यक्ष सूर्याजी महापात्रा, राष्ट्रीय प्रदेश सचिव संजय मरकड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिनभाऊ काळभोर यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.