Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्रराष्ट्रिय
बंजारा बिग्रेडचे शहराध्यक्ष प्रताप राठोड यांच्यातर्फे मिठाई वाटप
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवक्रांती कामगार संघटनेचे महाराष्ट्र संघटक आणि बंजारा ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रताप राठोड यांच्या वतीने कष्टकरी, कामगार कुटुंबियांना मिठाई वाटप करण्यात आले. तसेच, परिसरातील पत्रकार बांधवांनाही दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.
प्रताप राठोड म्हणाले की, गेली दोन वर्षे कोविडच्या महामारीमुळे सण-उत्सव साजरे करता आले नाही. मात्र, यावर्षी दिवाळी निर्बंधमुक्तपणे साजरी होत आहे. नागरिक उत्साहाने सण साजरा करीत आहेत. त्यामुळे गोरगरिब, कष्टकरी नागरिकांचीही दिवाळी गोड व्हावी. याकरिता खारीचा वाटा म्हणून मिठाई वाटप करण्यात आले.





