breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Learn-from-home-by-zeal-education : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी झील शिक्षण संस्थेचा उपक्रम ‘लर्न फॉर्म होम’

पुणे। महाईन्यूज । प्रतिनिधी

देशात करोना जागतिक साथ जाहीर केल्यानंतर युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतन संस्थांतील अध्यापनास शासन निर्देशानुसार सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वनभूमीला अनुसरून झील एजुकेशन सोसायटी पुणे,च्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी “लर्न फ्रॉम होम’हा उपक्रम सुरू केला आहे.

 यासाठी संस्था स्तरावर विशिष्ट नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र व्हर्चुअल क्लाोसरूम तयार करण्यात आली आहे. यामार्फत प्रत्येक विषयावर आधारित प्राध्यापकांनी बनवलेल्या चित्रफिती, माहिती देणारी प्रेसेंटेशन्स तसेच स्टडी मटेरियल गूगल क्लालसरूमद्वारेच पुरवण्यात येत असल्याचे सोसायटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

झील एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयेश काटकर म्हणाले की, पुढील काळात होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये जर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या रिकाम्या वेळेचा सदुपयोग केल्यास नकीच हा उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता वाढवेल. या काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळत चांगले गुण मिळवण्यासाठी स्टुडन्ट कनेक्ट  प्रोग्रामचा उपयोग करावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button