breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कात्रज – कोंढवा रस्त्याचे काम… भूसंपादनाचा अडथळा दूर

पुणे : कात्रज- कोंढवा रस्त्यासाठी शासनाने महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा करताच महापालिकेकडून तातडीनं रस्त्याच्या भूसंपादनासाठी पावले उचलण्यात आली आहे. मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्याच्या जागेवरून भूसंपादनाच्या कामाचे नियोजन सुरू केले आहे.

त्यानुसार, शासनाने जमा केलेल्या निधीतून महापालिकेकडून या रस्त्यासाठी राजस सोसायटी ते इस्कॉन मंदिराजवळील चौक यादरम्यानच्या जागेचे भुसंपादन केले जाणार असून ते सुमारे ४ लाख चौरस फुट असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा – पुण्यात झिका व्हायरस रुग्णांची संख्या सात वर

महापालिकेने २०१८ मध्ये कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. आता सहा वर्षे झाली, तरीही भूसंपादनाअभावी काम रेंगाळले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

ही घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांनी हा निधी वितरित करण्याचे आदेश काढण्यात आले. पण त्यातही २०० कोटींऐवजी १४० कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले. परंतु हा निधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला. आचारसंहिता उठल्यानंतर हा निधी अखेर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

महापालिकेकडून गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र, मागील वर्षी तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांनी या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी विशेष लक्ष दिले तसेच शासनाकडे सातत्याने या निधीसाठी पाठपुरावा करत जागा मालकांकडून संमती मिळवून रूंदीकरणाच्या कामाला गती दिली होती.

मात्र, लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ढाकणे यांची बदली झाल्याने पथ विभागाकडून या रस्त्याकडे पूर्णत: दूर्लक्ष केले आहे. त्यातच, शासनाचा निधी मिळण्याची केवळ औपचारीकता बाकी असल्याने निधी मिळण्यापूर्वीच पथ विभागाकडून भूसंपादनाचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्याकडून काहीच करण्यात आलेले नाही. मात्र, त्यामुळे आता वेळेत हे काम न झाल्यास पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेत ही प्रक्रीया रखडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button