breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

इंदापूर गोळीबाराची पुनरावृत्ती, ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर गोळीबार

पुणे | इंदापूर येथे हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. इंदापूरातील ही घटना ताजी असतानाच आज चाकणमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आला आहे. ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर दोघांनी गोळीबार केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे अस गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. सुदैवाने यात तो थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी राहुल पवार आणि अजय गायकवाडवर गोळीबार केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गायकवाड यास पोलीसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा    –    राज ठाकरे-अमित शाह यांची भेट, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणच्या रासे येथे दोघांनी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेल मालक स्वप्नील याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात सुदैवाने स्वप्नील हा थोडक्यात बचावला आहे. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला आहे. आरोपी राहुल पवारच्या भावाची चार महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात स्वप्नीलने मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. स्वप्नीलच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यात तो किरकोळ किरकोळ जखमी झाला आहे. स्वप्नील हा देखील सराईत गुन्हेगार आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button