मेट्रोच्या सेवा विस्तारासाठी शासन सकारात्मक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-99-780x470.jpg)
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे उद्घाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित आणि वेळेत प्रवास करणे शक्य होत आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारतर्फे योग्य ती मदत करण्यात येईल आणि केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सुशासन दिनानिमित्त बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पुणे मेट्रोच्या विविध कामांची माहिती दिली. तसेच मेट्रो प्रवासी संख्या वाढवण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी मेट्रोने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते मंडई मेट्रो स्थानक प्रवास केला. मंडई स्थानक येथे स्थानिक आमदार हेमंत रासने यांचे स्वागत केले.
हेही वाचा – राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
पुणे मेट्रो टप्पा एकच्या मार्गावर विस्तारित कामासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामधील पीसीएमसी-निगडी या मार्गावर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदाराची नेमणूक होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. स्वारगेट-कात्रज या मार्गाची निविदा अंतिम टप्प्यात असून लवकरच ठेकेदाराची नेमणूक करण्यात येईल.