breaking-newsताज्या घडामोडीपुणे

Good News: पुण्यातील कंपनीने विकसित केले करोना टेस्टिंग किट

पुणे- जगभर करोना रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्याला मदत व्हावी, याकरिता पुणेस्थित माय लॅब डिस्कवरी सोल्युशन या कंपनीने करोना चाचणी उपकरण म्हणजे टेस्टिंग किट विकसित केले आहे. उपकरणाचे नाव पॅथो डिटेक्ट कोव्हिड-19 असे आहे. या उपकरणाचे वैशिष्ट्यं म्हणजे हे संपूर्णतः देशी बनावटीचे उपकरण असून सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणापेक्षा याची किंमत बरीच कमी आहे.

मॉलिक्युलर डायग्नोस्टिक क्षेत्रात काम करीत असलेल्या या कंपनीने विकसित केलेल्या उपकरणाला कायदेशीर मान्यता सोमवारी मिळाली आहे. एका दिवसाला अशी 15 हजार उपकरणे तयार केली जाऊ शकतात. कंपनीचे लोणावळा येथे उत्पादन केंद्र आहे. गरज भासल्यास ही उत्पादनक्षमता 25 हजारापर्यंत वाढविली जाऊ शकते, असे कंपनीचे सहसंस्थापक श्रीकांत पाटोळे यांनी सांगितले.

या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो, हे दक्षिण कोरियात जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या घेतल्यानंतर दिसून आले आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे आणि विविध देशातील नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून माय लॅब कंपनीचे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या 500 लोकांना भारतामध्ये करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र आगामी काळामध्ये यात वाढ होण्याची भीती आहे. त्या परिस्थितीमध्ये अशा उपकरणाची भारताला मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.

करोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी सध्याच्या उपकरणाच्या मदतीने 6 ते 8 तास लागतात. मात्र, आम्ही विकसित केलेल्या उपकरणामुळे हे काम अडीच तासात होते, असे पाटोळे यांनी सांगितले. करोना व्हायरसचे नाव ऐकू येऊ लागल्यानंतर या कंपनीतील पंचवीस शास्त्रज्ञांनी यावर 6 आठवड्यांपूर्वी काम सुरू केले होते. या उपकरणाचा प्रयोग मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाल्यानंतर या उपकरणाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॅलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च व सेंट्रल ट्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. याच्या व्यावासाईक उत्पादनाला परवानगी मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button