Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

आज रात्रीपर्यंत घेता येणार अंत्यदर्शन, उद्या निघणार अंत्ययात्रा; अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान राहणार उपस्थित

 पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचं आज २८ जानेवारी रोजी दुःखद निधन झालं. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर त्यांचं पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं होतं. आता हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात ठेवण्यात येणार आहे. तसंच, उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.

अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. तर, उद्या सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल.

तसंच, उद्या सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ‘प्रशासकीय विषयांची उत्तम समज असलेला नेता’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button