पुण्यात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी आगीच्या घटना
![Fire incidents in 17 places due to firecrackers in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/acb007f5-1ee6-4d54-901a-be334d02cd70-780x470.jpeg)
दिवाळीचा (लक्ष्मीपूजन) सण काल सर्वांनीच मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. मात्र, काल पुणे शहरात फटाक्यांमुळे १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. तर औंध येथे चार बीएचकेचा फ्लॅट जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत फाटक्यामुळे १७ आगीच्या घटना घडल्या. त्याच दरम्यान औंध येथील डीपी रोडवरील इंडियन बँके जवळील १२ मजली टेरेजा सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये आग लागली असल्याची माहिती १०.३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला मिळाली. त्यानंतर आमची टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर चार बीएचकेचा फ्लॅट (२६०० स्क्वेअर फूट) पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर टेरेसवर असलेल्या नागरिकांना खाली काढण्यात आले. तर संबधित फ्लॅट धारकाकडे चौकशी केली असता घरांमध्ये बाहेरून फटका आल्याने आग लागल्याचे त्यांनी सांगितले.