Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विनानिविदा पुस्तकखरेदीला अखेर ब्रेक! आयुक्तांचा निर्णायक निर्णय; दोन कोटींची बचत

पुणे: महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक असताना प्रशासनाने साडेचार कोटी रुपयांची पूरक आणि व्यवसायपुस्तके विनानिविदा खरेदी करण्याचा घाट घातल्याचे समोर आले होते. विशिष्ट प्रकाशकाला लाभ देण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात असल्याची चर्चा होती. या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नामंजुरी दिली आहे. यामुळे पालिकेच्या २ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता व संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी व्यवसायपुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पालकांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर साहित्य मिळते आणि प्रशासनावर पारदर्शकतेचा शिक्का बसतो. मात्र, या वर्षाच्या शेवटी ही पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या प्रस्तावाबाबत संशय निर्माण झाला होता.

हेही वाचा –  आहिल्यानगर, मुंबई अन् नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास धो धो पाऊस; अलर्ट जारी

शैक्षणिक वर्ष संपत आलेले असताना आणि सहामाही परीक्षा देखील पूर्ण झाल्या असताना लेखन सरावपुस्तके देऊन नेमका कोणता शैक्षणिक लाभ होणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. याप्रकरणी काही मुख्याध्यापकांच्या समितीने विशिष्ट प्रकाशकांच्या पुस्तकांची निवड केली असून, त्यावर १५ ते २० टक्के डिस्काउंट देण्याची ऑफर देण्यात आली आहे. हीच पुस्तके बाजारात सहज उपलब्ध असून, त्यावर मोठी सवलत दर मिळतो.

त्यामुळे ही खरेदी विद्यार्थ्यांच्या नव्हे तर प्रकाशकांच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप झाला होता. हा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीसमोर आल्यावर आयुक्तांनी या प्रस्तावार हरकत घेतली. निविदा न काढताच ही खरेदी केली जाणार होती तसेच वर्ष संपत आल्यावर या पुस्तकांचा लाभ विद्याथ्यांना होणार नसल्याचे कारण देत आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला आहे. यामुळे पालिकेचे दोन कोटी रुपये वाचले आहेत, अशी चर्चा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button