पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह!
मद्यपी कार चालकाने नाकाबंदीसाठी तैनात महिला पोलिसाला उडवलं

पुणे : पुण्यात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची घटना घडली आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याऱ्या एक व्यक्तीने नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलिसाला उडवल्याचं पुढे आलं आहे. पुण्यातील मिल्स परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिला पोलीस कॉन्स्टेबल मिल्स परिसरात कर्तव्यावर तैनात होती. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक गाडी भरधाव वेगाने तिच्या अंगावर आली. त्यावेळी तिने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र, ही धडक इतकी जोरदार होती की यात ती गंभीर जखमी झाली.
हेही वाचा – विधानसभा मावळचे आमदार सुनील शेळके आज मंत्रीपदाची शपथ घेणार?
आरोपी हा जवळच असलेल्या पबमधून दारुपिऊन बाहेर पडल्याची माहिती आहे. दारुच्या नशेत त्याने भरधाव वेगाने गाडी चालवत नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाच्या अंगावर गाडी नेली.
बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत घटना घडली असून नायडू लेन (RTO ऑफिस जवळ) रुबी हॉस्पिटलकडून आरटीओच्या दिशेने जाताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दीपमाला राजू नायर असे जखमी महिला पोलिसाचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.





