‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील सुत्रधाराला अटक झालीच पाहिजे’
!['Dr. The mastermind behind Narendra Dabholkar's murder must be arrested '](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/dabholkr-780x470-1.jpg)
पुणे – फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर…. दाभोलकरांच्या खुनातील सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे. विवेकवादी विचार मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही विवेकवादी विचार रुजविण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार आणि विवेकाचा आवाज बुलंद ठेवणार असे सांगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर पुणे शाखा यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून पुणे महानगरपालिकेपर्यंत अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र अंनिसचे सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराने, प्रकाशन विभागाचे विशाल विमल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, मुकुंद किर्दत,मिलिंद चव्हाण, महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्या अध्यक्षा वनिता फाळके, कार्याध्यक्ष संदीप कांबळे, प्रधानसचिव विनोद खरटमोल, सहसचिव घनश्याम येणगे उपस्थित होते.