TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

महीला उद्योग क्षेत्रात आल्यास देश प्रगतीपथावर जाईल: नारायण राणे

फिक्की महिला उद्योजिकाकांच्या राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: देशातील एकूण उद्योग जगतात महिला फक्त 14 टक्केच आहेत परंतु अलीकडे महिलांचे उद्योग क्षेत्रात प्रमाण वाढत आहे , ते 30 टक्के झाले पाहिजे तसेच महिला जर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात आल्या तर देश प्रगतीपथावर जाईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला .फिक्की महिला आघाडीने राष्ट्रीय परिषद व प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात केले होते त्यावेळी ते बोलत होते पुढे ते म्हणाले की ,फिक्की ही संस्था महिला उद्योजकांसाठी फार मोठे काम करीत असून या संस्थेला बरोबर घेऊन पुण्यात लवकरच महिला उद्योजक निर्माण व्हावे यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग विभागामार्फत प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित देशभरातील महिला उद्योजिका यांना दिले .या केंद्रातून ग्रामीण भागातील महिलांना विविध लघु व हस्तकला तसेच इतर उद्योगाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी बनिविण्याचे काम करण्यात येणार येईल असे ते म्हणाले . तसेच आजच्या कार्यक्रमातून मला महिलांसाठी उद्योग व व्यवसायात महिलांसाठी विशेष काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे सांगून त्यांनी फिक्की महिला आघाडीचे व उद्योजिका यांचे कौतुक केले .
यावेळी देशभरातील महिलांच्या दुर्मिळ ,हस्तकला तसेच विविध वस्तंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याची पाहणी नारायण राणे यांनी केली व महिलांना प्रोत्साहन दिले .
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फिक्की पुणे च्या अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी फिक्की ने केलेल्या व पुणे जिल्ह्यातील 6 दत्तक घेतलेल्या गावांची माहिती दिली .तसेच या राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या आयोजना मागील भूमिका विषद केली .
या समारंभास फिक्की च्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया ,फिक्की पुणे अध्यक्षा निलम
सेवलेकर ,वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर ,खजिनदार सोनिया राव ,पिंकी राजपाल यासह देशभरातून आलेल्या फिक्की महिला आघाडी पदाधिकारी व महिला उद्योजिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button