Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: Good News…पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच कोरोनाबाधित झाले पूर्ण बरे
राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ताण हलका करणारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, पाच रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.