breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus : पुण्यात तीन दिवस हॉटेल राहणार बंद, वैशाली, रुपाली, गुडलकमध्ये शुकशुकाट

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता पुण्यातील व्यापारी संघटना, रेस्तराँ आणि हॉटेल असोसिएशनने उद्यापासून तीन दिवस शहरातील सर्व हॉटेल आणि बार स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वैशाली, रुपाली, वाडेश्वर आणि गुडलक कॅफेसारखी नेहमीची गर्दीची रेस्तराँ आज काही काळासाठी सुरू ठेवली होती.

व्यापारी संघटनांनी सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यानुसार, आज मंगळवारी (दि. 17) शहरात सगळीकडे शुकशुकाट दिसत होता. मात्र, हॉटेल्स, रेस्तराँ, बार सुरुच होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी पोलिसांनी शहरातील प्रसिद्ध आणि गर्दीची रेस्तराँ असलेल्या वैशाली, रुपाली आणि गुडलक कॅफेच्या मालकांना रेस्तराँ बंद करण्याच्या सूचना केल्या.

पोलिसांनी ही रेस्तराँ बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अचानकपणे सांगितल्याने आमची अडचण झाल्याचे गुडलक आणि वैशाली हॉटेलच्या मालकांनी सांगितलं. पोलिसांनी याबाबत आधीच माहिती देणं गरजेचं होतं. तसेच, याबाबत कुठलाही आदेश किंवा नोटीस दिली नसल्याने आधीच खाद्यपदार्थ बनवून ठेवल्याने ते वाया जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यामुळेच ही रेस्तराँ खाद्यपदार्थ संपेपर्यंत मंगळवारी काही प्रमाणात उघडी ठेवण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button