breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus | पुण्यात आणखी ४ जणांना करोना लागण

पुणे | पुण्यात शनिवारी रात्री उशिरा एका ज्येष्ठ नागरिकासह रविवारी दिवसभरात आणखी तीन अशा चार जणांना ‘करोना’ची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामध्ये बारामती शहरातील एका चाळीस वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.

पुणे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली असून, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘करोना’चे बारा रुग्ण आढळले आहेत.
पुण्यातील ७६ वर्षांच्या एका ज्येष्ठ व्यक्तीला शनिवारी रात्री उशिरा हृदयाशी निगडित त्रास सुरू झाला. त्यांचा ‘ईसीजी’ काढण्यात आला. त्यात काही बिघाड दिसून आला. तसेच श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचे आढळून आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्रवाच्या चाचणीचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला पाठविण्यात आले. त्यांना लागण झाल्याचे निदान झाले. त्यांना ताप किंवा गेल्या महिनाभरात परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button