Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यातील क्वारंटाईनमधील काही जण बेपत्ता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Home-Quarantine-1.jpg)
देशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच करोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनंही मोठी पावलं उचलली आहेत. राज्यात ३१ मार्चपर्यंत नागरी भागांमध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तर केंद्र सरकारनंही ३१ तारखेपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.