#CoronaVirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेशबंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Pune-Municpal-Corporation.jpg)
पुणे : पुणे महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. महापालिकेत कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कालपासून मनपा भवनात आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मनपात ठेकेदार, नागरिक आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी केली आहे. पालिकेतील गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेत कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र असे असूनही पालिकेत गर्दीचे प्रमाण घटत नव्हतं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका सेवा आणि कामकाजासंदर्भात नगरसेवकांच्या सूचना प्रस्ताव निवेदनसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूरध्वनी, ई-मेल किंवा व्हॉट्सअॅपच्या जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.
दरम्यान, पुण्यातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आतापर्यंत 17 हजार 445 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 637 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 11 हजार पेक्षा अधिक कोरोनामुक्त झाले आहेत.