Breaking-newsपुणेमुंबई
#Coronaएकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/police-1.jpg)
पुणे/मुंबई : एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी गेला. पुण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त सकाळी आलं, तर मुंबईतही तिघा पोलिसांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले.
पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना संबंधित वाहतूक पोलिसाची प्राणज्योत मालवली. आतापर्यंत पुण्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात एकूण 26 पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तेरा जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, तर अकरा जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापूर्वी फरासखाना पोलीस स्थानकातील सहाय्यक फौजदाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे.