महात्मा गांधी पुण्यतिथीदिनी सामुदायिक प्रार्थना,व्याख्यान,पुस्तक प्रकाशन
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सोमवारी,३० जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता सामुदायिक प्रार्थना,ज्येष्ठ पत्रकार आणि गांधीविचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांच्या व्याख्यानाचे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडून आयोजन करण्यात आले आहे.यावेळी महात्मा गांधी लिखित ‘धर्मविचार भाग-१ आणि धर्मविचार भाग-२’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. हे कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे होतील . महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रा. डॉ. मणीन्द्र नाथ ठाकुर यांचे व्याख्यान व संवाद सत्राचा २९ आणि ३० जानेवारीचा नियोजित कार्यक्रम रद्द झाला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड , आदित्य आरेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.