ताज्या घडामोडीपुणे

शहरातील काही भागातील पाणीपुरवाठा बंद

पिंपरी चिंचवडमधील काही भागात पाणी येणार नाही

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) शहरातील काही भारातील पाणीपुरवाठा बंद राहणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधीलही काही भागात पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्या भागात उद्या पाणीपुरवठा बंद असेल ते जाणून घेऊयात.

पुण्यातील या भागात पाणी पुरवठा बंद राहणार
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, फुरसुंगी, उरूळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी या भागातील पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे.

हेही वाचा –  पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव

त्याचबरोबर खराडी भाग, आपले घर, भानगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदननगर, बोराटेनगर, यशवंतनगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, माळवाडी, महावीरनगर, शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाढेश्वरनगर, मारूतीनगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटेनगर, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
निगडी भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्यामुळे नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी या भागातील पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे.

याबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, ‘निगडी परिसरातील मेट्रो कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना होणारा तात्पुरता गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.’

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button