पुणेकरांनो लक्ष द्या! धूलीवंदनामुळे सकाळची मेट्रो सेवा बंद

पुणे | धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्च २०२६ रोजी पुणे मेट्रोची प्रवासी सेवा अर्धा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेट्रो सेवा पूर्णपणे स्थगित राहील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची निवडणूक संपन्न
दुपारी ३.०० नंतर मात्र मेट्रो सेवा पुन्हा सुरू होऊन रात्री ११.०० पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
सणाच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच मेट्रो सेवेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सवर लक्ष ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.




