एक्झर्बिया अबोड जांभुळ सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti was celebrated with enthusiasm at Exorbia Abod Jambhul Society](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Xrbia--780x470.jpg)
मावळः छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक, युद्धनीती, राजनिती निपुण असे जगातील आदर्श लोककल्याणकारी राजे होते, शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांनी वाचन केले पाहिजे, त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा सर्वांनी जोपासावा असे प्रतिपादन एक्झर्बिया संकुलातील मंडळाचे मार्गदर्शक सतिश कदम यांनी केले. एक्झर्बिया रहिवाशी सोसायटीमध्ये (रविवार दिनांक 19 फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कदम बोलत होते. सायंकाळी 4 वाजता छत्रपतींच्या अर्ध पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर निणादून गेला होता.सोसायटी परिसरात सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण भगवेमय झाले होते. महिलांची देखील उपस्थिती लक्षणीय होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-35-768x1024.png)
एक्झर्बिया अबोड मिञ मंडळ, जांभुळ यांनी सोसायटीमध्ये वर्ष १, शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन कऱण्यात आले. त्यानंतर फुलं हार माल्यार्पण करण्यात आले, त्यानंतर दिप प्रज्वलन करून, गारद आणि आरती कऱण्यात आली, आणि संपूर्ण सोसायटी परिसर हा शिवाजी महाराजांच्या जययकारात दुमदुमून गेला. शिवाजी महाराज याचे पोवाडे वाजले गेले, प्रसाद वाटप करण्यात आला, यामध्ये सर्व सोसायटीमधील महिला, लहान मुले आणि बांधव उपस्थित होते. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, मार्गदर्शक सतीश कदम, पंढरीनाथ हिंगे, दिपक पाटील, कृष्णा लोखंडे, सचिन कासार, सचिन कुंभार, संजय शिंदे, दिनेश सकट, सुमित पुरी, सुनिल पवार, प्रसन्न शिरोडकर, सार्थक कुंभार, निलेश परदेशी आदींनी परिश्रम घेतले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-36-768x1024.png)