विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल

पुणे | विधानसभा निवडणुक २०२४ च्या कामकाजाच्या अनुषंगाने गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथून मतदान प्रक्रियेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पी.एम.पी.एम.एल बसेसच्या वाहनतळाकरीता जागा उपलब्ध व्हावी, तसेच पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता १९ व २० नोव्हेंबर २०२४ रोजी स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
स्वारगेट ते नेहरु स्टेडियम दरम्यानचे रस्त्यावर १९ नोव्हेंबर रोजी ६ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच २० नोव्हेंबर रोजी सांय ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारी वाहतक हॉटेल नटराजकडील लेनवर प्रवेश बंद येणार आहे. नागरिकांना जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यासाठी ओव्हरब्रिज खालील डावीकडील लेनने इच्छित स्थळी जाता येणार आहे.
हेही वाचा – मिशन विधानसभा : आमदार सुनील शेळके यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची वज्रमूठ…!
सोलापुर रोडने जेधे चौक अंडरपासने सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक ओव्हर ब्रीज खालील डावीकडे वळण घेऊन होल्गा चौकामध्ये उजवीकडे वळण घेवन इच्छित्त स्थळी जाता येणार आहे, असे पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.





