Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वारगेट स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ : पोलिस, एसटी प्रशासनाचे सर्वेक्षण

पुणे : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वारगेट बसस्थानकावर नवीन चांगल्या दर्जाचे आणि आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सद्यःस्थितीत १८ कॅमेरे असून, आणखी नवीन ४२ कॅमेरे बसविले जाणार आहे. हे कॅमेरे रात्रीची दृष्टीची (नाईट व्हीजन) सुविधा असलेले असणार आहे. शिवाय नवीन कॅमेरे बसविण्यापूर्वी एसटी प्रशासन स्वारगेट पोलिसांसोबत एकत्रित सर्वेक्षणदेखील करणार आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या दृष्टीने उपयोगी ठरणाऱ्या जागेची निश्चिती करता येईल. सीसीटीव्हीमुळे प्रवासी सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने स्वारगेटसह राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकावर कार्यशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. सर्वच बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर स्वारगेट बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्री अजित पवारपुण्यात झळकले बॅनर

स्वारगेट बसस्थानकावर सध्या बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांची जागा चुकीची असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा तपास करताना अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी रात्री अंधार आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, अंधार असल्याने त्याचा उपयोग होत नाही. ही बाब ‘सकाळ’ने उजेडात आणल्यानंतर एसटी प्रशासनाने पोलिसांसमवेत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसात सर्वेक्षणाला सुरुवात होईल.

एसटी प्रशासन आणि पोलिस एकत्रित सर्वेक्षण करून सीसीटीव्ही बसविण्याच्या जागेचे सर्वेक्षण केले जाईल. बसविण्यात येणारे कॅमेरे चांगल्या दर्जाचे असणार आहेत. प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होण्यासाठी एसटीने हे पाऊल उचलले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button