Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
स्थिर सर्वेक्षण पथकाकडून मांजरी बुद्रुक येथे सुमारे १३ लाख रुपयांची रोकड जप्त
![Cash worth around Rs.13 lakh seized by the static survey team at Manjari Budruk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Pune-24-780x470.jpg)
पुणे | हडपसर विधानसभा मतदारसंघात हडपसर येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असताना पुणे सोलापूर रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे द्राक्ष संशोधन केंद्रासमोर ह्युंदाई क्रेटा वाहन क्रंमाक एमएच ४६ सीएच ३७५७ या वाहनात १२ लाख ९९ हजार ५०० रुपये आढळून आले. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनातील इसम वसीऊल्ला वलीउल्ला खान यांना रक्कमेबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर रक्कम ही त्यांच्या भंगार व्यवसायाची असल्याबाबत सांगीतले. परंतु त्याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदर रक्कमेचा सविस्तर पंचनामा करुन, गुन्ह्याची नोंद करुन रक्कम आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे असे हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षकांनी कळविले आहे.