शहरात पोलिसांकडून नाकाबंदी

पुणे : पुणे पोलिसांनी सोमवारी (दि. २४) दुपारी चार ते सहा या वेळेत शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक आणि रहदारीच्या ठिकाणी अचानक नाकाबंदी केली. या कारवाईत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून १३ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांनी सोमवारी (दि. २४) दुपारनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ७८ महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी केली. यावेळी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहर, तसेच उपनगरातील प्रमुख चौकांत वाहनांची तपासणी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
हेही वाचा – तीन दिवस शहर रामभरोसे? आयुक्तांसह, वरिष्ठ अधिकारी शहर धोरणावर चर्चेसाठी शहराबाहेर !
उलट्या दिशेने येणारे वाहनचालक, ट्रिपल सीट, मोटार चालविताना सीटबेल्ट न लावणे, मोबाइलवर संभाषण अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या एक हजार ५१८ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. या वाहनचालकांकडून १३ लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण ४,१८७ वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच ३७१ वाहने जप्त करण्यात आली.
या कारवाईत चार अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, पाच पोलीस उपायुक्त, दहा सहायक आयुक्त तसेच शहरातील ३९ पोलीस ठाण्यातील ९७ अधिकारी आणि एक हजार ८७२ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
वाहतूक नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीर वस्तू तसेच हत्यारे सोबत घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे हा या नाकाबंदीचा उद्देश आहे.
– संदीपसिंह गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक