Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आता दत्तक देण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्यानं ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत नवी योजना तयारी केली आहे. या योजनेंतर्गंत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसास्थळं दत्तक घेता येणार आहेत.पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून “ऍडॉप्ट अ हेरिटेज” ही खास योजना तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा    –      मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मैन; म्हणाली, तो माझा..

“ऍडॉप्ट अ हेरिटेज” या योजनेंतर्गत ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक घेता येणार आहेत. वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळे संस्थेला दत्तक देण्याची केंद्र सरकारची ही योजना आहे. या योजनेंतर्गंत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसास्थळं दत्तक घेता येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील ही पाच वारसा स्थळं घेता येणार दत्तक

1 शनिवारवाडा

2 आगाखान पॅलेस

3 पाताळेश्वर लेणी

4 लोहगड

5 कार्ला लेणी आणि भाजे लेणी

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button