breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथे आयपीएल सामन्यावर सट्टा

पुणे : पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना छापा टाकून अटक कऱण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

वसीम बाबासाहेब बागवान (वय ३६, रा. सनराईज अपार्टमेंट, हांडेवाडी रस्ता, हडपसर), तेजस कन्हैयालाल रुपारेल (वय ४२, रा. पौर्णिमा अपार्टमेंट, सॅलिसबरी पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – ‘मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यला मी तयार करने, असा शब्द फडणवीसांनी दिला होता’; उद्धव ठाकरेंचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सॅलिसबरी पार्क परिसरातील पौर्णिमा अपार्टमेंटमधील एका सदनिकेत बागवान आणि रुपारेल आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.बागवान आणि रुपारेल सट्टा घेत असल्याचे घेत असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले.

ही कारवाई  पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आणि पथकाने ही कारवाई केली. या आधीही कोथरुड परिसरात गुन्हे शाखेने छापा टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना पकडले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button