ताज्या घडामोडीपुणे
पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीचा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
![साताऱ्यात कामगारांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/manfire1.jpg)
पुणे | पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.संबंधित व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याने स्वतःला पेटवून का घेतले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीचे नाव देखील अद्याप समोर आले नाही. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..