उधार पैसे परत मागितल्यानेआला राग; डोक्यात कुऱ्हाड घालून निघृण हत्या
![Anger at being asked to repay a loan; Assassination with an ax to the head](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Anger-at-being-asked-to-repay-a-loan-Assassination-with-an-ax-to-the-head.png)
पुणे |उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार करत निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज बाबुराव जाधव (३४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील बाबुराव माणिक जाधव(५५) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (३५,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची धनराज नावाची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून २० हजार रुपये उसणे घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने उसणे दिलेले पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराजच्या घराबाहेर आला होता.
असा घडला सर्व प्रकार
तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. परत परत पैसै मागण्याच्या रागात गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खरात तपास करत आहेत.