अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे

पुणे : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारयांचा उद्या (सोमवारी ता.22) वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळतानाच चित्र दिसून येत आहेत. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी या निमित्ताने होत असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे, पिंपरी-चिंचवड दौऱ्यावरती आहे. या दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत त्यांचा जन्मदिवस साजरा केला. पण यावेळी चर्चा सुरू झाली ती त्यांच्या केकची. अजित पवारांसाठी आणलेल्या केकवरती ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’, असं लिहण्यात आलेलं होतं.
अजितदादांसाठी आणलेल्या या केकची सध्या जोरदार चर्चा झाली आहे. अजित पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी काळात मुख्यमंत्री पद मिळावं अशा शुभेच्छा त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देताना दिसून येत आहेत. राज्यात अनेकदा त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर देखील लावलेले दिसून आले होते. मात्र, सध्या या केकची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आणलेला हा केक स्वतः अजित दादांनी कापत या शुभेच्छांचा स्वीकार ही केला. पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील आदिराज शितोळे आणि समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – दोन्ही पवार एकत्र आले अन् बोललेही!
शरद पवारांनी बालेकिल्ल्यात धक्का दिल्यानंतर अजित पवार सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. काल(शनिवारी) शरद पवारांची सभा झाल्यावर आज अजित पवार याठिकाणी मेळावा घेत आहेत. तत्पूर्वी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी तुतारी फुंकल्यावर अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय झाले आहेत. शरद पवारांनी आपल्या शिलेदारांना आपल्याकडे खेचू नये म्हणून अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ते या ठिकाणी बैठका आणि मेळावा घेताना दिसत आहेत. अजित गव्हाणेंच्या जागी नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती ही आज होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि समस्या घेऊन आणलेल्या नागरिकांची भेटण्यासाठी झुंबड उडालेली आहे. ही झुंबड हटविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे.
राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर मंत्रालयासह विधानभवन परिसरात लागल्याचे दिसून येत आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावण्याचं काम जोरदार सरू आहे.