ताज्या घडामोडीपुणे
बाणेरमध्ये घराचे लॉक तोडून 5 लाख 18 हजारांचा ऐवज चोरीस
![5 lakh 18 thousand was stolen by breaking the lock of a house in Baner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/gharphodi.jpg)
पुणे | पुण्यातल्या बाणेर येथील विरभद्रनगरमध्ये घराचे लॅच लॉक तोडून 5 लाख 18 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रोजी सकाळी साडेअकरा ते साडेपाचदरम्यान घडली.या प्रकरणी विनय ताम्हाणे (वय 28, रा. बाणेर, पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटचे लॉक तोडून एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 17 हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 18 हजार रुपयांच्या ऐवज लंपास केला आहे. पोलीस तपास करत आहेत.