वसंत मोरेंनी मनसे सोडल्याची चर्चा; राज ठाकरेंच्या दौऱ्यातील अनुपस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती समोर
![3 industrialists in the state targeted by CBI; Mumbai-Pune lines](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/3-industrialists-in-the-state-targeted-by-CBI-Mumbai-Pune-lines-1.jpg)
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. यासाठी ते आज पुण्याहूनऔरंगाबादकडे रवाना झाले. राज ठाकरे हे कालपासून त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी होते. यावेळी मनसेच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. पण या सगळ्यात मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे मात्र कुठेही दिसले नाही. त्यामुळे राजकारणात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. पण अखेर वसंत मोरे हे वढू बुद्रुक तुळापूर इथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. ते पुढे आता राज ठाकरेंसोबतच असणार आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविऱ्हाम लागला आहे.
राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले आणि आज ते औरंगाबादसाठी रवाना झाले. पण ते पुण्यात असताना अनेक कार्यकर्त्यांनी निवासस्थानी गर्दी केली होती. पण यावेळी कुठेही वसंत मोरे दिसून आले नाहीत. खरंतर, गेल्या काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांना विरोध केला होता. मात्र, राज ठाकरे यांचे विशेष लक्ष असलेल्या पुण्यात वसंत मोरे यांनी सुरुवातीपासूनच या आदेशाला विरोध केला. यावेळी मोठ्या नाराजी नाट्यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपण मनसेतच असल्याचं स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरून सध्या राजकारण तापलं आहे. अशात वसंत मोरे हे राज ठाकरेंचे सच्चे समर्थक आहेत. पण ते पुण्यात कुठेही दिसले नाही. इतकंच नाहीतर राज ठाकरे औरंगाबादला निघाले असतानाही ते दिसले नसल्याने वसंत मोरे यांनी मनसे सोडली का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण आता या चर्चांना पूर्णविऱ्हाम लागला.
वसंत मोरे पुण्यात दौऱ्यात गैरहजर होते, कारण…
यासंबंधी अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता, राज्य सरचिटनीस हेमंत संभूष यांनी महत्त्वाची माहिती दिली. काही वयक्तिक कारणामुळे वसंत मोरे उपस्थित नव्हते. मात्र, ते औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. मोरे हे परस्पर औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हेमंत संभूष यांनी दिली.